पुणे ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम ) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे, महाराष्ट्रा च्या राजकारणात आज एक सर्वात मोठी घडामोड घडणार आहे, दरम्यान तब्बल दोन दशकानंतर आज शनिवारी पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकाच मंचावर मुंबईतील वरळीत एकत्र येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन चैतन्य पसरले आहे,व त्यांच्यात आज मोठा उत्सव पाहायला मिळत आहे,त्यात नाशिक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी आज चक्क गुढी उभारली आहे, दरम्यान विजय मेळाव्या निमित्त ही गुढी उभारली आहे, तसेच दोन भाऊ एकत्र येत आहेत,हा महाराष्ट्रा साठी आनंदाचा दिवस आहे,अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांच्या मात्र आता पोटात भितीचा गोळा उठला आहे,तर त्यांना हे ठाकरे बंधू महाराष्ट्रा च्या तमाम मराठी माणसासाठी एकत्र आल्या मुळे काहीजणांना आता हिंदूंचा पुळका आला व माध्यामासमोर अनाब शनाब वक्तव्य करत आहेत,