पुणे ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवारी आषाढी एकादशी निमित्त अवघी पंढरीपूरनगरी सजली आहे, दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल -रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे, यावेळी नाशिकचे मानाचे वारकरी उगले दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला आहे, ते देखील पुजेत सहभागी झाले होते,विधीवत पध्दतीने पुजा संपन्न झाली ,सदर पुजे नंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि मानाचे वारकरी उगले दाम्पत्याला विठ्ठल -रुक्मिणीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार मंदिर समितीचे वतीने करण्यात आला,
दरम्यान विठ्ठल -रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होतो,वारीची परंपरा ही शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे, शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, हेच मी विठूरायाकडे साकडं घातलं आहे, भक्त -भगवंतातले अंतर जिथे दूर होते तिथे विठ्ठलाचा वास आहे, ज्या ज्या गोष्टीत शेतकरी वर्गाचे कल्याण आहे,तेच माझ्या हातून होवो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमां शी बोलताना म्हणाले आहे,