पुणे ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे,पुणे ही शिक्षणाची पंढरी, पण आता लेखणी ऐवजी काॅलेजमध्ये चक्क आले कोयते आणि 🔨 हातोडे दरम्यान पुण्यातील कॅम्प भागातील आझम कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला आहे, विद्यार्थ्यांनी हातात कोयते आणि 🔨 हातोडा हाती घेऊन धुमाकूळ घातला आहे, दरम्यान या मारहाणीत दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत, तसेच कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाणीचा चक्क व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, दरम्यान पोलिस आता या व्हिडिओ नंतर आरोपींचा शोध घेत आहेत, सदर घटनेनंतर विद्यार्थी व पालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,
दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कॅम्प भागातील आझम कॅम्पसच्या बाहेर असणाऱ्या हाॅटेलच्या बाहेर ही घटना घडली आहे, दरम्यान पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे, अनेक परराज्यातून तसेच बाहेरच्या देशातून अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी पुण्यात येतात पण आता अशा काही उद्योगी विद्यार्थ्यांपुढे पुण्याचे नाव बदनाम झाले आहे, दरम्यान आता काॅलेज मध्ये लेखणीच्या ऐवजी तिची जागा आता कोयत्याने घेतली आहे, दरम्यान काॅलेजमध्ये चक्क कोयते येतात कसे हे न उलगडणारे कोडे आहे,सदर व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांमध्ये कोयता आणि हातोड्याने हाणामारी झाली आहे,व या मारहाणीत दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत, पोलिसांनी 👮 आता या घटनेचा तपास सुरू केला आहे,यात हाणामारी करणारे हे काॅलेजचे विद्यार्थी आहेत का ? बाहेरचे आता पोलिस तपास करत आहेत, तसेच सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 👮 कॅम्पस मधील सीसीटीव्ही कॅमेरा 📷 फुटेज तपासणी करुन हाणामारी करणा-या विद्यार्थ्यां चा शोध घेत आहेत,या विद्यार्थ्यांनी कॅम्पस मध्ये असलेल्या हाॅटेलची देखील तोडफोड केली आहे, दरम्यान पुण्यातील कोयता गॅंग चक्क आता काॅलेजमध्ये घुसली आहे,