पुणे ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बुलढाण्यातील खामगाव येथून आली आहे, दरम्यान आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी करुन घरी परतणाऱ्या वारकऱ्यांची बस आज पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील खाम गाव येथे पलटल्यांने बस मधील ३० वारकरी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत, दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही, दरम्यान बस अपघात मध्ये गंभीर रित्या जखमी झालेल्या वारकऱ्यांना उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,