पुणे ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळ जनक अपडेट आली आहे, पुणे रेल्वे स्टेशन समोर आसणा-या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा प्रयत्न केल्या ची खळबळजनक माहिती समोर येत आहे, दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी 👮 एकाला अटक केली आहे.दरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुरज शुक्ला असे त्याचे नाव आहे, दरम्यान या प्रकरणात पोलिस आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत,
सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे स्टेशन समोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे मुंडके शुक्ला हा हातातील कोयत्या ने केल्याचा प्रयत्न बाबत प्राथमिक माहिती मिळत आहे,असे एका प्रत्यक्षदर्शींने सांगितले, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे, दरम्यान रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे, तसेच शुक्ला या स्टेशन परिसरात गोंधळ घालत होता, तसेच त्यानंतर त्यांने हातामधील कोयता घेऊन स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जाऊन विटंबना करणाऱ्यांचा प्रयत्न केला, त्याच्या हातात धारदार शस्त्र होते, दरम्यान पुतळ्याची विटंबना करण्यापूर्वीच शुक्ला याला रेल्वे पोलिसांनी 👮 पकडले, दरम्यान आता पोलिस शुक्ला याची कसून चौकशी करत आहेत, दरम्यान सुरज शुक्ला हा मुळचा राहणारा हा उत्तर प्रदेश येथील आहे, आता पोलिस शुक्ला हा कोणत्या धार्मिक संस्थेशी संबंधित आहे का ? याची चौकशी करत आहेत,