पुणे ७ जुलै (आताच सकाळी एक खळबळ जनक अपडेट ही रायगड जिल्ह्यातून आली आहे, रायगडच्या समुद्रकिनारी मुरुड तालुक्या तील कोरलाई या ठिकाणी खोल समुद्रात एक संशयास्पद बोट ⛵ आढळून आली आहे,तर सदरची बोट ही पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, दरम्यान सदरची बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे, दरम्यान सदरच्या बोटीतून काही संशयास्पद व्यक्ती उतरल्याचा देखील संशय आहे, दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी रायगड जिल्हा मध्ये नाकाबंदी आणि झाडाझडती सुरू केली आहे,तर या बोटीचा शोध हेलिकॉप्टर द्वारा सुरू केला आहे,
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सदरची बोट ⛵ रायगड जिल्ह्यातील कोलाई बंदरात खोल समुद्रात आज पहाटेच्या सुमारास दिसली आहे,तर सदरची बोट ही पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, तसेच या संशयास्पद बोट मधून काही लोक उतरल्याचे संशय असून त्यादुष्टीने पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर येऊन तपास करीत आहे, दरम्यान पोलिसांनी 👮 कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे, रायगड पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल व स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस नौदलपथक.व बाॅम्बशोधक पथक सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत,तर आता या बोटीचा शोध नौदलाच्या हेलिकॉप्टर द्वारा सुरू आहे, दरम्यान याबाबत रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारावर बोलण्यास नकार दिला आहे,