पुणे ८ जूलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मीरा-भाईंदर येथे मनसे व मराठा बांधव यांनी आज मराठी अस्मितेसाठी मोर्चाचे आयोजन केले होते, परंतु महायुती सरकारने पोलिसांच्या माध्यमातून कालच मनसे अध्यक्ष व पदाधिकारी व मराठा बांधवांची धरपकड सुरू केली होती,व आज देखील मीरा- भाईंदर येथे मराठा एकीकरण समितीचे सदस्य माणसां ची धरपकड सुरूच आहे, तर दुसरीकडे भाजप हे गुजराती व अमराठी माणसांसाठी कार्पेट अथरत आहे,हे सर्व मराठी व अमराठी यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा डाव हे महायुती सरकार करत आहे,असा गंभीर आरोप मनसेचे नेते व मराठा एकीकरण समितीचे सदस्यांनी केला आहे,
दरम्यान महायुती सरकारच्या प्रचंड अशा दबावानंतर देखील मनसे व शिवसेना तसेच मराठा एकीकरण समितीचे सदस्य व हजारो मराठी बांधवांनी एकजुटीने मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला आहे, तसेच मोर्चा हा मीरारोड स्टेशन पर्यंत काढला आहे, तर मनसे आज दिवसभर आंदोलनावर ठाम आहे, दरम्यान मराठा एकीकरण समितीचे सदस्य व शिवसेना व मराठा बांधवांनी पोलिस यंत्रणा व महायुती सरकारच्या 👃 नाकावर टिच्चून मोठ्या संख्येने मोर्चा काढून एक प्रकारे सरकार व पोलिसांना आवहान दिले आहे.यात अनेक मनसे कार्यकर्ते व मराठा बांधव व मराठा एकीकरण समितीचे सदस्य तसेच पदाधिकारी तसेच महिलांना देखील या महायुती सरकारने पोलिसांच्या दबाव आणून त्यांची उचलबांगडी केली आहे, दरम्यान हे महायुती सरकार मराठी आणि अमराठी असा वाद करुन दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे,असे मनसेचे नेते तसेच शिवसेनाचे नेते आणि मराठा एकीकरण समितीने म्हटले आहे, शेवटी मराठा समाजा पुढे महायुती सरकार हातबल झाले आहे.