Home Breaking News एकनाथ शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवास मधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांला बेदम...

एकनाथ शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवास मधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांला बेदम मारहाण

125
0

पुणे ९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईवरून आली आहे, पावसाळी अधिवेशन सुरू असून अनेक आमदार हे मुंबई मधील आमदार निवासात मुक्कामी आहेत . दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास मधील कॅन्टीन मधील कामगाराला बेदम मारहाण केली आहे, दरम्यान निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे,

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासस्थानी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना कॅन्टीन मधून काल रात्री जेवण आले होते, दरम्यान या जेवणात असलेल्या भाजीचा वास येत होता. म्हणून आमदार महाशयाचा पारा चढला व ते टाॅवेल व बनियनवरच थेट कॅन्टीन मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांला भाजीचा वास घे व शिळं जेवण का दिले म्हणून कॅन्टीन कामगाराला बेदम मारहाण केली आहे, यावेळी एक कर्मचाऱ्यांने त्यांचा व्हिडिओ काढला आहे, दरम्यान या कॅन्टीन चालकांला देखील धारेवर धरले आहे. दरम्यान आमदार निवास मधील कॅन्टीन मध्ये आमदारांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते म्हणून ते आज सदनमध्ये अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार आहेत,अशी माहिती मिळत आहे, दरम्यान कॅन्टीन कर्मचाऱ्यांला मारहाण केल्यानंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे,

Previous articleआज भारत बंदची घोषणा!२५ कोटी कामगारांची हाक
Next articleआज गुरुवारी गुरुपौर्णिमा शिक्षकांमुळेच तर आपण घडलो,तर गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here