पुणे ११ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही रेल्वे संदर्भात आली असून, रेल्वेचा अपघात झाला आहे, रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत ते लोणावळा दरम्यान मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे,मंकी हिलजवळ मालगाडी रेल्वे ट्रॅकवरुन घसरली आहे, सदरच्या अपघातानंतर लांब पल्ल्यांच्या रेल्वे एक्स्प्रेस वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे, दरम्यान या अपघातामुळे रेल्वेच्या वेळापत्रकांवर परिणाम झाला आहे, दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीने मालगाडीचे घसरलेले डबे काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, दरम्यान अनेक एक्स्प्रेस अलिकडे असलेल्या रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत,