पुणे १५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे जिल्ह्यातून आली आहे, दरम्यान सूत्रान कडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्या मधील घोडेगाव मध्ये भरघाव लक्झरी बसने दुचाकीस्वारांना चिरडले आहे, दरम्यान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर ते भीमाशंकर रोडवर घोडेगाव येथे ही घटना घडली आहे, भरघाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने दुचाकीस्वारांना जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील ३ मित्रांचा मृत्यू झाला आहे,
दरम्यान उत्तरप्रदेश येथून काही भाविक हे श्रावण महिना असल्याने भिमाशंकर येथे खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने आले होते. बस भिमाशंकरकडे जात होते,तर दुचाकीस्वार हे घोडेगाव येथून मंचरला जात असताना हा अपघात झाला आहे,बसने दुचाकीस्वारांना काही अंतर फरफटत नेले आहे,यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, दरम्यान अपघातामधील तिन्ही मित्र हे आंबेगाव तालुक्यातील कोळवडी गावातील होते,यात मृत्यू झालेल्या तीन जणांचे नावे १) अथर्व खमसे २) गणेश असवले ३)भारत वाजे असे आहे, दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे, अपघात झाल्यानंतर बस चालक हा पळून गेला आहे,तर पोलिसांनी 👮 बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत,