पुणे १५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईवरून आली आहे, बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज (BSE) ला बाॅम्बची धमकी मिळाली आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काॅम्रेड पिनारायी विजयन यांच्या नावाने एका आयडीवरुन BSE ला एक ईमेल पाठविण्यात आला, सदरच्या ईमेल मध्ये म्हटले होते की इमारतीत ४ आयडी आणि आरडीएक्स पेरण्यात आले आहेत, इमारतीत सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास स्फोट होईल, दरम्यान याची माहिती मिळताच पोलिस व बाॅम्बशोधक पथक तातडीने बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजमध्ये दाखल होऊन संपूर्ण इमारतीची तपासणी केली, परंतु सदरच्या इमारतीत काहीही संशयास्पद आढळले नाही.