पुणे १६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट मुंबईवरून आली आहे, शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ आहे, दरम्यान दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी संपणार आहे, त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणांची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, दरम्यान हे पद आता काॅग्रेस पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी काॅग्रेसचे सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे,