पुणे १६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक दुःखद अशी अपडेट आली असून, लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ.दीपक टिळक यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले आहे, दरम्यान त्यांच्या मागे मुलगा,मुलगी व नातवंडे असा परिवार आहे,आज सकाळी ८ ते ११ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे, त्यांच्यावर दुपारी १२ नंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे,