पुणे १६ जुलै (,, पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे, पुण्यातील शासकीय रुग्णालयात एका युवकाने युवतीच्या माध्यमातून ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घातला व तोडफोड केली आहे, दरम्यान यावेळी तोडफोड रोखण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षक यांना धमकी देत त्यांना धक्काबुक्की केली आहे , दरम्यान या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये १) स्वप्निल धनगर (वय २५) २) राणी पाटील (वय २५) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान स्वप्निल व राणी यांना ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला भेटू न दिल्याने त्या दोघांनी संतप्त होत ससून रुग्णालयाची तोडफोड केली आहे ,अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे,