पुणे १७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही अकोल्यातून आली आहे, अकोल्यात दोन गटात राडा झाला आहे, दरम्यान वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात गोळीबार करण्यात आला आहे, दरम्यान गोळीबाराच्या या घटनेत एकूण ८ जण जखमी झाले आहेत, शहरातील कृषी नगर भागात आज गुरुवारी सायंकाळी आकाश गवई,व संतोष वानखडे यांचे दोन गट आमने सामने आले, दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, दरम्यान या घटनेत १५ पेक्षा अधिक आरोपींचा यात समावेश असून पोलिसांकडून तपास सुरू आहे, दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर आता या भागात एकच दहशत निर्माण झाली आहे,