Home Breaking News विधानभवनात तुफान मारामारी… कार्यकर्ते अपसात भिडले, मुख्यमंत्र्यांनी सर्व विषय सोडून कारवाई करावी...

विधानभवनात तुफान मारामारी… कार्यकर्ते अपसात भिडले, मुख्यमंत्र्यांनी सर्व विषय सोडून कारवाई करावी – उध्दव ठाकरे

341
0

पुणे १७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात काल विधानसभेच्या गेटवर वाद पाहायला मिळाला. यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती, यानंतर आता दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे,याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,आता महायुती सरकारमध्ये लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित नसल्याची चर्चा सुरू आहे,

आमदारांना धक्काबुक्की, गुंडागर्दी विधान भवनापर्यंत पोहचली म्हणजे अवघड आहे,असे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे, तसेच ज्यांनी त्यांना पास दिले, त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे, मुख्यमंत्री,व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून ताबडतोब या गुंडांवरती आणि त्यांच्या पोशिंद्यावरती कडक कारवाई करावी,असे देखील ते म्हणाले.तसेच विधानभवन पवित्र मंदिर आहे, या पवित्र मंदिरात गुंडांना पास कोणी दिले? असा सवाल देखील त्यांनी या वेळी केला आहे,

Previous articleनाशिक मध्ये अल्टो कारला भिषण अपघातात ७ जणांचा मृत्यू
Next articleअकोल्यातील दोन गटात तुफान गोळीबार ८ जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here