पुणे १७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईतून आली आहे, दरम्यान एकेकाळी पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून तसेच सुसंस्कृत अशी संपूर्ण जगात एक ओळख होती,तर परदेशातून देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी हे शिक्षणासाठी येतात, आताच्या काळात हेच पुणे कोयता गॅंगच्या विळख्यात सापडले आहे, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, यामुळे पुणेकरांना आता ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे ‘ अशी आता म्हणण्याची वेळ आली आहे,असे दैनिक सामन्याच्या अग्रलेखा मधून धनकवडी भागातील तळजाई टेकडीवर घडलेल्या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे, दरम्यान पुण्यातील भाईगिरी का वाढत आहे? याचे उत्तर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवाभाऊंना नाही तर कुणाला विचारायचे?. असा सवालही यातून उपस्थित केला आहे,