पुणे १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईवरून आली आहे,काल रात्री पोलिसां ची जीप आडवल्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे,
दरम्यान काल विधानभवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यावर 👮 पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती, त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या जीपच्या पुढं झोपले होते म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आज मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,