पुणे १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे, मुंबईतील वांद्रे येथे दुर्दैवी घटना घडली आहे, दरम्यान घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन मजली चाळ कोसळली आहे,तर मलब्या खाली १२ ते १५ जण रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे,तर सदरची घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू केले आहे,
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मलब्या खाली अडकलेल्या १० जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे, त्यांना तातडीने उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दरम्यान मुंबईतील वांद्रे येथील भारत नगर येथे चाळ क्रमांक ३७ येथे आज शुक्रवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घरातील सिलिंडरचा स्फोट झाला सदरच्या घटनेनंतर तीन मजली चाळ कोसळली आहे. दरम्यान सदर घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या ह्या घटनास्थळी तातडीने दखल होत बचावकार्य सुरू केले आहे, दरम्यान मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मलब्या खाली अडकलेल्या १२ जणांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दरम्यान अग्निशमन विभाग मुंबई व मुंबई पोलिस आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी मदत व बचावकार्य सुरू केले आहे,