पुणे १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्राच्या राजकारणा बाबत एक खळबळजनक अपडेट आली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार थोड्याच वेळापूर्वी राज्यपाल यांच्याकडे रवाना झाले आहेत, काल गुरुवारी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर झालेली हाणामारी व आमदार निवास कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला झालेली मारहाण तसेच जनसुरक्षा आयोगावर स्वाक्षरी करु नये, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून आता गुंडगिरी विधान भवनात दाखल झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रा मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व आमदार हे राज्यपाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत,
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल गुरुवारी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ५ कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांना कपडे फाटूपर्यत मारहाण केली व तसेच महायुती सरकारने पडळकर यांच्या कार्यकर्त्यां ना अटक न करता आमदार आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला काल रात्री साडे बारा वाजता अटक केली आहे, तसेच आमदार आव्हाड यांनी कारवाईसाठी विरोध केला असता त्यांना पोलिसांनी 👮 बळाचा वापर करून फरफटत ओढून टाकलं आहे, तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधील कर्मचारी याला बेदम मारहाण केली आहे, त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर बनला आहे, तसेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार हे बळजबरीने जनसुरक्षा आयोग माथी मारत आहे, त्यामुळे या जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करु नये अशी मागणी केली आहे, तसेच महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार मध्ये कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडीचे सर्व आमदार राज्यपाल यांच्याकडे करण्यासाठी रवाना झाले आहेत,