पुणे १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे, दरम्यान स्वाक्षरी साठी आलेले जनसुरक्षा विधेयक पुनर्विचारा साठी सरकारला परत पाठविण्यात यावे,आज शुक्रवारी सकाळी अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याकडे केल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे आमदार व जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली आहे, दरम्यान हे बिल राज्यातील महायुती सरकारचे अपयश लपविण्यासाठी व सरकारच्या विरोधात बोलणा-या लोकांना दाबण्यासाठी आणण्यात आले आहे, दरम्यान हे विधेयक जनसुरक्षा नाही तर सरकार सुरक्षा असे बिल आहे, तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे,असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत,