मुंबई १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन विधानसभेचे कामकाज सुरू आहे, दरम्यान काल गुरुवारी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला कपडे फाट्यापर्यंत मारहाण केली होती, दरम्यान या राड्यानंतर आज विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी अॅकशन मोडवर येत कडक असे निर्णय घेतले आहेत,
दरम्यान या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला आहे, त्यानंतर विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सदनात येण्या साठी देण्यात येणारा पास रद्द केला आहे.व तसेच यापुढे त्यांना विधानसभेच्या सदनात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय घेतला आहे, यापुढे फक्त आमदार यांचे स्वीय सहायक शासकीय अधिकारी व पत्रकार यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, तसेच यापुढे विधानभवन मधील दालनात होणा-या सर्व मंत्र्यांच्या बैठकी बाबत सगळे ब्रीफिंग करणे आता गरजेचे आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे,