मुंबई १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईतील असून ,काल गुरुवारी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेष्ठ नेते शरदचंद्र पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला कपडे फाट्या पर्यंत मारहाण केल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उलटले व अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महायुती सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे,त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभापती नंतर चांगले अॅकशन मोडवर आले असून त्यांनी या घटनेची दखल घेतली आहे,
दरम्यान त्यांनी बोलताना म्हणाले आहे की, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालच्या गुरुवारी झालेल्या घटनेत कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही, या सदनात बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झालेली आहे,आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहे,त्या एकट्या गोपीचंद पडळकर यांच्या माणसाला पडत नाही, आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जात आहे, हे सगळे आमदार माजले