पुणे दिनांक १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे.आज देखील पाऊसाने हजेरी लावली आहे.आज खराडीत गारांचा पाऊस पडला आहे. मोठ मोठ्या गारा जमिनीवर पडत होत्या.दरम्यान आज वाघोलीत देखील गारांचा पाऊस झाला आहे.आज दुपार पासून ढसाळ वातावरण निर्माण झाले होते.तसेच उकडादेखील होता.दरम्यान दुपारी पावने चार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवर चांगला पाऊस झाला.खराडी व वाघोली परिसरात देखील पाऊस झाला आहे.
दरम्यान वाघोली येथील उबाळे नगर येथे प्रचंड वारा व पाऊसा मुळे येथील होर्डिंग्ज कोसळले त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली व वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटर रांगा लागल्या होत्या.दरम्यान वा-यामुळे विद्यृत तारा तुटून चार चाकी वाहनांवर पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे.वारा प्रचंड प्रमाणावर असल्याने अनेक दुकानांचे बोर्ड तुटले तर काही ठिकाणी होर्डिंग्जचे कापड फाटून ते उडत होते.पुणे ते नगर महामार्गावर सर्वत्र पाणी साचले होते.अजून ढगाळ वातावरण असून ढगांचा कडकडाट सुरू आहे.तर काही ठिकाणी वीजा लवलवत आहे.पण पुण्यात पाऊस झाल्यानंतर गार हवा सुटली आहे.