Home क्राईम पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करुन ४२ पिस्तूल व ७४ जिवंत काडतुसेसह...

    पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करुन ४२ पिस्तूल व ७४ जिवंत काडतुसेसह एकूण २८ सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

    161
    0

    पुणे दिनांक २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने व एकूण १४ पोलिस स्टेशन पोलिसांनी संयुक्त अशी मोठ्या प्रमाणावर मोहिम राबविण्यात येऊन बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.यात एकूण ४२ पिस्तूल व ७४ जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन २८ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.यात गुन्हे शाखेचे युनिट तीनच्या पथकाने २१ मार्च रोजी केलेल्या कारवाईत प्रशांत मगम पवार ( वय २८ रा.सिंहगड रोड पुणे) यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे एक किया कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे.तर मेघराज उर्फ पप्पु लक्ष्मण दराडे ( वय ३२ रा.अहमदनगर) यांच्या कडून चार पिस्तूल व १० काडतुसे तर समीर हरीभाऊ हरपुडे ( वय ३२ रा. कोथरूड पुणे) यांच्या कडून एक पिस्तूल असा एकूण १९ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत एकूण २८ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान यात दिनांक १४ एप्रिल रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये तडीपार गुन्हेगार निखिल राजू शिरसाठ (वय २१ रा.धायरी पुणे) याला अटक करून सहा पिस्तूल १० काडतुसे मोपेड कोयता असा एकूण २ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर दिनांक १५ एप्रिल रोजी पोलिसांनी 👮 केलेल्या कारवाईत तडीपार गुंड अश्र्विन बाळकृष्ण लोणारे ( वय २० रा.धायरी पुणे) याला अटक करून तीन पिस्तूल व ६ काडतुसे जप्त करण्यात आली आहे.तसेच वैभव अनंता तरडे ( वय २३ रा.धायरी पुणे) याच्याकडून ३ पिस्तूल व ६ काडतुसे असा एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २२ मार्च रोजी खंडणी विरोधी पथक एकने सुरज रोहिदास खंडागळे ( वय ३० रा.वारजे पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व दोन काडतुसे असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २९ मार्च रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सागर गणेश सुतार ( २३ रा.वारजे पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व २ काडतुसे असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच दिनांक १ एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक दोनने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन ५ पिस्तूल ११ काडतुसे जप्त केली आहे.व दिनांक ९ एप्रिल रोजी अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे ( वय ३१ रा.कोंढवा बुद्रुक पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व ३ काडतुसे असा एकूण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच दिनांक ४ एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ओमकार विनोद पवार (वय २५ रा. अप्पर बिबवेवाडी पुणे) याला ताब्यात घेऊन एक पिस्तूल व दोन काडतुसे असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आता प्रर्यतची सर्वात अशी मोठी कारवाई असून यात सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील धायरी मधील गुन्हेगारांची संख्या जास्त आहे व त्या खालोखाल वारजे येथील गुन्हेगारांची संख्या अधिक आहे.

    Previous articleमनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली
    Next articleपुण्यात पुढील तीन दिवस लगातार विजांच्या कडकडाटात पाऊस.हवामन खात्याचा इशारा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here