पुणे दिनांक २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गुजरात मधील कांदा निर्यातबंदी उठवली पण महाराष्ट्रात कांदा जाणून बुजून सडवला जात आहे.नरेंद्र मोदी हे देशाचे नाहीत फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत.अशी टिका राज्यसभाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की गुजरातमधील अमूल डेअरीने महाराष्ट्रातील अति दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा पाठवला.म्हणून मोदींनी अमूल डेरीच्या संचालका विरुद्ध गुन्हे दाखल केले.हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र द्वेष. महाराष्ट्रातील शेतकरी हा तडफडून मेला पाहिजे.असे मोदींना वाटते.असे देखील यावेळी संजय राऊत हे म्हणाले आहेत.