पुणे दिनांक २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई उत्तर मध्य मधून भाजपने जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड व विरुद्ध जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे.तर भाजपच्या वतीने विद्यमान खासदार पुनम महाजन यांचे तिकीट कापले आहे.दरम्यान खासदार पुनम महाजन यांना या मतदार संघात होत असलेल्या विरोधामुळे भाजपने या मतदारसंघात नवीन चेहरा मैदानात उतरवला आहे.भाजप या मतदारसंघात कोणाला संधी देणार याची सर्वांना उत्सुकता होती.
दरम्यान उज्ज्वल निकम हे जेष्ठ कायदेतज्ज्ञ असून ते सरकारी वकील आहेत.त्यांनी अनेक मोठ मोठ्या खटल्यात सरकारी वकील म्हणून म्हत्वाची भुमिका बजावली आहे.दहशतवादी कसाब विरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम केले आहे.त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.यापूर्वी त्यांनी कल्याण रेल्वे बाॅम्ब स्फोट खटला. तसेच मुंबई साखळी बाॉम्ब स्फोट खटला.पुण्यातील गाजलेले राठी हत्याकांड.तसेच खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला असे अनेक खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.