पुणे दिनांक ६ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स व सनराईज हैदराबाद या दोन संघात सामना होत असून या सामन्यासाठी दोन्ही संघात आता नाणेफेक झाली असून यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी 🎳 करण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई इंडियन्स संघाने आता पर्यंत एकूण अकरा सामने खेळले असून यातील फक्त तीन सामने जिंकले आहेत तर आठ सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत झाली आहे.दरम्यान प्लेऑफ मध्ये जाण्या करिता त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकायला लागतील.तसेज अन्य संघाच्या कामगिरीवर देखील मुंबई इंडियन्स संघाचे भवितव्य अवलंबून आहे.दरम्यान हैदराबाद सनराईजने गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.तर मुंबई इंडियन्स दहाव्या स्थानी आहे.