पुणे दिनांक ७ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे व शिर्डीचे लोकसभा महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे या दोघांच्या प्रचारासाठी आज सभा होत आहे.ही सभा अहमदनगर येथील संत निरंकारी भवन मैदानावर सभा सुरू आहे . दरम्यान या सभेची जय्यत तयारी राधाकृष्ण विखे पाटील व सुजय पाटील पिता पूत्रान कडून करण्यात आली आहे.सदरच्या मांडवात एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील व ममहाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार निलेश लंके यांच्यात होत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता भाषण सुरू आहे.