Home कृषी नवी मुंबईत तुफानी वादळसह पावसाला सुरुवात

    नवी मुंबईत तुफानी वादळसह पावसाला सुरुवात

    344
    0

    पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.बदलापूर डोंबिवली कल्याण येथे तुफानी वादळ वा-यासह अवकाळी पाऊस पडत आहे.दरम्यान अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.रोडवर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.तर या अचानकपणे आलेल्या पावसामुळे रेल्वे प्रवाशांना फटका बसला आहे.तसेच या पावसाने वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

    दरम्यान नवी मुंबईत तुफानी वादळ सुरु झाले असून यातच पाऊस देखील जोरदारपणे सुरू आहे.ऐरोली च्या बाजूने धुळीचे वादळ आले असून ते पुढे मुलुंड कडे धडकले आहे.अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.वाशी जुईनगर सानपाडा . बदलापूर.कल्याण.ठाणे.येथे जोरात पाऊस सुरू झाला आहे.तसेच अनेक भागात काळेकुट्ट ढग ☁️ दाटून आले आहेत.

    Previous articleसीबीएसईचा निकाल जाहीर.मुलींनीच मारली बाजी
    Next articleमुंबईत वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे सेवा ठप्प; नोकरदारांचे हाल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here