पुणे दिनांक १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.सीबीआयच्या एका खटल्यात त्यांना जामीन देण्यात आला आहे. परंतु आणखी एका खटल्यात त्यांना जामीन होणे अजून बाकी आहे.
दरम्यान अविनाश भोसले हे मागील दोन वर्षांपासून सीबीआयच्या कोठडीत आहे मे २०२२ रोजी त्यांना सीबीआयने अटक केली होती.दरम्यान मागील एक वर्षापूर्वी त्यांनी हायकोर्टात जामीन साठी हायकोर्टात धाव घेतली होती.परंतू हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती.त्या नंतर त्यांना हायकोर्टाने सीबीआय च्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.परंतू अद्याप ईडीच्या प्रकरणात त्यांना अद्याप दिलासा मिळाला नाही.त्यामुळे आता त्यांची तुरुंगामधून सुटका होतेय की नाही हे पाहावं लागणार आहे.