पुणे दिनांक १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेतील मुख्य फरार आरोपी भावेश भिंडेला अटक केल्यानंतर आज त्याला पोलिसांनी 👮 कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला दहा दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थान येथील उदयपूर येथून भावेश याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला मुंबई येथील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.त्याला कोर्टाने २६ मे पर्यंत पोलिस कस्टडी सुनवली आहे.कोर्टात पोलिसांनी 👮 आरोपीची १४ दिवसांची पोलिस कस्टडी मागितली होती.परंतू कोर्टाने १० दिवसांची पोलिस कस्टडी सुनवली आहे.दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी दुर्घटना ही मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग्ज कोसळून या झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता.तर यात ८० नागरिक हे जखमी झाले होते.भावेश भिंडेच्या एका चुकीने १६ लोकांचा नाहक बळी गेला.व अनेक वाहनांचे नुकसान झाले.