Home क्राईम सोलापूर येथील उजनी धरणात बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले.पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम...

    सोलापूर येथील उजनी धरणात बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले.पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू

    475
    0

    पुणे दिनांक २३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट ⛵ उलटून मंगळवारी दिनांक २२ मे रोजी झालेल्या दुर्घटनेत एकूण सहाजण बुडाले होते.शोधकार्यात यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत.दरम्यान आज सकाळी गुरुवारी पाण्यावर तरंगतांना हे मृतदेह आढळून आले आहे.एनडीआर‌एफचे जवान व 👮 पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतले आहे.पोलिसांकडून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.

    दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या दुर्घटनेत तीन पुरुष व एक महिला व एक लहान मुलांचा समावेश आहे.यातील अजून एक व्यक्तीचा मृतदेह सापडला नसून त्याचा शोध हे पथक घेत आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात ही दुर्घटना घडली होती.दरम्यान या घटनेनंतर एनडीआर‌एफची टीम व पोलिस यांच्या संयुक्त पथकाकडून बचावकार्य सुरू असताना काल बुधवारी ३५ फोट खोल पाण्यात बोट ⛵ व एक मोटारसायकल 🏍️ या पथकाला सापडली होती.परंतू या पात्रात बुडालेले व्यक्ती सापडले नव्हते.दरम्यान या पथकाने आज गुरुवारी सकाळीच पून्हा शोध मोहीम हाती घेतली यावेळी या पथकाला सहा पैकी पाच मृतदेह हे पाण्यात तरंगताना सापडले त्यांची नावे १) गोकुळ दत्तात्रय जाधव ( वय ३० ) २) कोमल जाधव ( वय २५) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्षे) ३) माही गोकुळ जाधव (वय ३) ४) अनुराग अवघडे ( वय‌ ३५) व ५) गौरव धनंजय डोंगरे ( वय १६) अशी त्यांची नावे आहेत.

    Previous articleकरवीर विधानसभेचे आमदार पी.एन.पाटील यांचे आज पहाटे निधन.काॅग्रेस पक्षाचा निष्ठावंत शिलेदार हरपला
    Next articleअहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत SDRF पथकाची ⛵ बोट बुडून तीन जवानांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here