पुणे दिनांक २३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार डोंबिवली येथील एमआयडीसी मधील फेज दोन मधील अंबर केमिकल या कंपनीत बाॅयलरचा स्फोट झाल्याने कंपनी मधील चार कामगारांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.तर या स्फोटात एकूण ३३ कामगार गंभीरपणे जखमी झाले आहे.मृतांत दोन महिला व दोन पुरुष यांचा समावेश आहे.केमीकल कंपनीला 🔥 आग लागताच १३ अग्निशमन दलाच्या गाड्या व १३ टॅंकर तातडीने घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.या स्फोटातील जखमींपैकी २४ जणांवर एम्स हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत तर ९ जणांवर नेपच्यून हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या आगीत केमिकल कंपनी जळून बेचिराख झाली आहे.