पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केंद्र सरकारच्या दुरसंचार विभागाच्या वतीने हरवलेल्या अथवा गहाळ झालेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती मिळवण्यासाठी (Central Equipment Identiy Register -CEIR) ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या प्रणालीचा माध्यमातून वापर करून डेक्कन पोलिसांनी 👮 डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस महिला पोलिस अंमलदर उमा पालवे.सरोजा देवर.सुप्रिया सोनवणे व पोलिस अंमलदर रोहित पाथरुट यांच्या टिमने CEIR प्रणालीवर वेगवेगळ्या राज्यात तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांत हरवलेले मोबाईल चालू असल्याबाबत माहिती दिसत होती.सायबर पोलिसांनी ही माहिती संकलित करून हे मोबाईल वापरणां-याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून एक महिन्याच्या आत नागरिकांचे २ लाख १० हजार रुपयांचे एकूण १३ मोबाईल फोन हस्तगत केले आहे.
दरम्यान सदरची कामगिरी ही पोलिस उपायुक्त परिमंडळ एकचे संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस व ( गुन्हे) शकंर साळुंखे यांच्या सुचनेनुसार सायबर पोलिस पथकाच्या महिला पोलिस अंमलदर उमा पालवे.सुप्रिया सोनवणे.सरोजा देवर .व पोलिस अंमलदर रोहित पाथरुट यांच्या पथकाने केली आहे.