पुणे दिनांक २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळीच आता हाती आलेल्या अपडेट नुसार राजधानी दिल्लीतून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटमध्ये बाॅम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली.त्यानंतर या फ्लाईट मधील सर्व प्रवाशांना तातडीने इमर्जन्सी गेट मधून उतरवण्यात आलं.दरम्यान यावेळी काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी चक्क विमानातून उड्या मारल्या.बाॅम्बच्या अफवेमुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.घटनास्थळी सुरक्षा अधिकारी व पोलिस दाखल झाले असून तसेच बाॅम्ब शोधक पथक देखील दाखल झाले असून ते विमानाची कसून तपासणी करत आहे.हे इंडिगो कंपनीचे विमान असून ते दिल्ली वरुन वाराणसीला आज मंगळवारी पहाटे ५.३५ लाख उड्डाण करणार असताना ही घटना घडली आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.