पुणे दिनांक ३० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील प्रसिद्ध हाॅटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांडात डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज गुरुवारी हा निकाल दिला आहे. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए.एम.पाटील यांनी डॉन छोटा राजनला या खटल्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबईत ज्या शेट्टी या प्रसिद्ध अशा हाॅटेल व्यावसायिक होत्या त्या मुंबईतील गोल्डन क्राउन हाॅटेलच्या मालकीण होत्या.डाॅन छोटा राजन टोळीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती.त्यासाठी राजन टोळीने त्यांना फोन करुन खंडणी साठी धमकी देखील दिली होती.त्यांनी या टोळीला खंडणी देण्यास नकार दिला होता.त्यानंतर डॉन छोटा राजनच्या दोन शुटरनी त्यांच्या हाॅटेलमध्ये जाउन त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.