पुणे दिनांक २ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील म्हाडा योजनेतील सदनिका फेरवितरण पध्दतीने घेण्या करीता अर्ज केल्यानंतर मुख्याधिका-यांच्या नावाने २ लाख ७० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कामगाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.पुणे स्टेशन भागात ही कारवाई करण्यात आली आहे.या बाबत बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये या कामगारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या प्रकरणी ६० वर्षीय तक्रार दाराने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अभिजित व्यंकटराव जिचकार ( वय ३४ रा. वाकड पुणे) असे आहे.ते म्हाडा कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत.या प्रकरणी पोलिस अधीक्षक अमोल तांबे.अतिरिक्त अधीक्षक डॉ.शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव यांच्या पथकाने केली आहे.या बाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वीरनाथ माने हे करीत आहेत.