पुणे दिनांक ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे.दरम्यान राज्य सरकारने सगेसोयरे व ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.पण सगेसोयरे व ओबीसीचे प्रमाणपत्र अद्याप मराठा समाजाच्या युवकांना दिले नाही.याकरीता मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारला सहा महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु यावर राज्य सरकारच्या वतीने कोणताच निर्णय घेतला नाही.म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे.आज दुपारी अंबड तालुक्याचे तहसीलदार धनश्री भालचिम यांनी अंतरवाली सराटीत दाखल होत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची तातडीने भेट घेतली आहे.त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत.आज उपोषण मागे घेण्याचे विनंती पत्र यावेळी तहसीलदार धनश्री भालचिम यांनी जरांगे पाटील यांना दिले आहे.