Home Breaking News उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली ;ओबीसी कार्यकर्त्यां कडून धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको...

उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली ;ओबीसी कार्यकर्त्यां कडून धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन

445
0

पुणे दिनांक१८ जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून याकरिता जालन्यातील ओबीसी समाज आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान ओबीसी समाजाचे नेते व उपोषणकर्ते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती खुपच खालावली आहे. त्यांच्या शरिरातील साखर कमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सांगितले असून हाके मात्र उपोषणावर ठाम आहेत. त्यांची प्रकृती खालावल्या नंतर आता ओबीसी समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज सांयकाळी ओबीसी समाजाच्या  कार्यकर्त्यांनी धुळे- सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे धुळे- सोलापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. व मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी पोलिस👮 दाखल झाले असून त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

Previous articleपुण्यातील ६० ते ७० हाॅस्पीटल बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी; ई-मेल मिळताच पुण्यात एकच खळबळ
Next articleपुण्यातील गोल्फ चौकात भरघाव वेगाने आलेल्या मर्सिडिज कारने दुचाकी स्वारला चिरडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here