पुणे दिनांक २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रायगडावर आज तिथीनुसार ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा सोहळा साजरा होत आहे आज सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.व त्यानंतर त्यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. आज सकाळी रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोपवे च्या माध्यमातून रायगडावर पोहोचले आहेत. त्यांच्या समावेत उपमुख्यमंत्री अजित पवार अदिती तटकरे.व अन्य मंत्री देखील उपस्थित होते.या पाश्र्वभूमीवर रायगडावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे अन्य शिवभक्त यांना व्हिआयपी मोमेंट असल्याने त्यांना तिथे पोलिस सोडत नसल्याने अनेक शिवभक्त हे मोठ्या प्रमाणावर नाराज झाले.रायगडावर आज पाऊस असल्याने अनेक शिवभक्तांना रोपवे च्या माध्यमातूनच रायगडा वर जावे लागत होते.आज शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने रायगडावर आकर्षक रोषणाई व सजावट मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती.दरम्यान पाऊस असताना देखील शिवभक्त मोठ्या संख्येने रायगडावर दाखल होत आहेत.आज शिवराज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.