पुणे दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार धायरी फाटा येथील अभिरुची माॅलच्यापुढे सिंहगड रोडवरील सिंहगड पोलिस चौकीच्या जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयाच्या पुढे सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे.दरम्यान या गोळीबारात सुदैवाने अल्पवयीन मुलाला एकही गोळी लागली नाही.तो बचावला आहे.दरम्यान हा गोळीबार वर्दळीच्या ठिकाणी झाला आहे.गोळीबाराची घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.दरम्यान या गोळीबारानंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान दोनच दिवसांपूर्वी सिंहगड रोडवरील किरकिट वाडीत देखील २० ते २५ जणांच्या टोळक्याने येथील एका युवकाला बेदम मारहाण केली होती.व या भागातील लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता.