पुणे दिनांक २४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ‘एल३-लिक्विड लीजर लाउंज ‘ या पबची दुपारी अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान या पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारु व ड्रग्स दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर काल पुणे पोलिसांनी 👮 या पबवर कारवाई करण्यात येऊन हा पब सिल केला होता.व यात एकूण आठ जणांना पुणे पोलिसांनी अटक करून शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील अधिकारी यांच्या सह दोन बिट अंमलदार असे एकूण चार जणांचे निलंबन केले आहे.दरम्यान सोमवारी दुपारच्या सुमारास पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा पब फोडल्याची माहिती मिळत आहे.यात कुंड्या व एलसीडी दगडफेक करून तोडली आहे.१० ते १२ जणांनी ही दगडफेक करून पब तोडण्यात आला आहे.पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे.पुण्यात ही पब संस्कृती नाही पाहिजे.असे पतितपावनचे कार्यकर्ते म्हणत होते.