पुणे दिनांक २६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) टि २० विश्र्वचषक २०२४ चार उपांत्य सामना दिनांक २७ जून रोजी भारत व इंग्लंड यांच्यात गयाना येथे खेळला जाणार आहे.दरम्यान या ठिकाणी सामना सुरू होण्यापूर्वीच या सामन्यांवर संकाटाचे ढग ☁️ दाटून आले आहेत.दरम्यान टीम इंडियाचा संघ काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गयनाला पोहोचला आणि त्यानंतर काही वेळातच जोरदार वादळासह पाऊस पडत आहे.या सामन्यावर जवळपास ८०टक्के पावसाची शक्यता आहे.तसेच या सामन्यासाठी कोणत्याही प्रकारचा रिजव्ह डे ठेवण्यात आलेला नाही.
दरम्यान आतापर्यंत टी-२० वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी करत थेट सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे.आता सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंड संघाबरोबर होणार आहे.हा सामना उद्या दिनांक २७ जूनला गुरुवारी खेळला जाणार आहे.तरी पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे.परंतू भारत विरुद्ध इंग्लंड मॅचसाठी राखीव दिवस नाही.त्या मुळे सामना रद्द झाला तरी टीम इंडिया फायनलला जाणार आहे.