पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.तर काही भागात अद्याप पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग पाऊसाच्या प्रतिक्षा मध्ये आहे. काही ठिकाणी खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.तर काही ठिकाणी पाऊसा अभावी पेरण्या झाल्या नाहीत. दरम्यान येत्या ४८ तासात महाराष्ट्रात मुसाळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यात मान्सून व्यापला असलातरी मात्र काही दिवसांत पाऊसाचा जोर कमी पडला आहे.आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान मध्यंतरी पाऊसाने दडी मारली होती.आज मराठवाड्यातील जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह व वादळीवाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तर मुंबईत पुढील काही तासांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून या भागात मध्यम तर अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तविण्यात येत आहे.दक्षिण कोकणात अति मुसाळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण घाटमाथ्यावर मुसाळधार पाऊस होईल.विदर्भ तसेच मराठवाड्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.तसेच रत्नागिरी.रायगड.सिंधूदुर्ग.सह पुणे सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच छत्रपती संभाजीनगर.जालना. परभणी.अमरावती.हिंगोली.नांदेड.वर्धा.नागपूर.भंडारा गोंदिया.चंद्रपूर.या भागाला देखील यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.