पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवार दिनांक २७ जून रोजी आज सकाळ पासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.आज विधिमंडळाच्या पाय-यांवर विरोधी पक्षाचे आमदार हे आंदोलन करत आहेत.विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या आंदोलन सुरू आहे. आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते व आमदार यांनी आंदोलन सुरू केले आहे यात प्रामुख्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या वरुन जोरात सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे.यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहे. शेतकरी वर्गाला या सरकारने फसवले आहे.शेतकरी यांची फसवणूक या सरकारने केली आहे.असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.आम्ही हाऊस मध्ये देखील यांची मागणी करणार आहे.आज विधीमंडळाच्या पाय-यांवर ४० टक्के सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.आता विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.