पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अहमदनगर येथील महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी साठी चक्क आठ लाख रुपयांची लाच मागितली आहे .या लाच प्रकरणी अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच अहमदनगरच्या महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय मध्ये धाड मारत आयुक्त यांच्या कार्यालयाची तपासणी केली आहे.
दरम्यान या कारवाई बाबत अधिकृत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त पंकज जावळे यांच्या सरकारी निवासस्थान व त्यांचा स्विय सहाय्यक व लिपीक शेखर देशपांडे व अन्य कर्मचारी यांच्या निवासाची देखील तपासणी केली आहे.या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आयुक्त जावळे यांच्या शासकीय निवासस्थान हे सील केले आहे.दरम्यान ही लाच स्वीकारण्यासाठी आयुक्त जावळे व त्यांचा स्विय सहाय्यक देशपांडे यांनी आज ऑफीस मधे सुट्टी टाकली आहे.तसेच या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक ट्रॅपची माहिती समजल्यानंतर दोघांनी त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ ठेवले असून दोघेजण फरार झाले आहेत.दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्यांच्या कार्यालयावर निवासस्थानी धाड टाकल्या नंतर त्यांच्याहाती काय पुरावे सापडले हे अद्याप समजू शकलेले नाही.दरम्यान सदरची लाच लुचपत विभागाच्या धाडी नंतर अहमदनगर येथील नागरिकांनी अहमदनगर महानगरपालिका समोर फटाके 🎆 फोडून या कारवाईचे समर्थन केले आहे. अशी माहिती मिळत आहे.