पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शनिवार दिनांक २९ जून रोजी रात्री आठ वाजता बारबाडोस या ठिकाणी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलचा थरार होणार आहे.दरम्यान २७ जून रोजी भारताने इंग्लंड संघाला नमवून फायनल मध्ये प्रवेश केला आहे.तसेच या सामन्यात भारत व दक्षिण आफ्रिकेचा संघ आज ही ट्राॅफी जिंकण्यासाठी एकामेकांसमोर झुंजणार आहेत.दरम्यान आज सकाळ पासून बारबाडोस येथे मुसाळधार पाऊस कोसळत आहे.एकंदरीत या फायनल सामन्यावर पावसाचे संकट उभे ठाकले आहे.
दरम्यान आज हा सामना बारबाडोस येथे तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता तर भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल .आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज होणां-या सामन्याच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.तर ७२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान यापूर्वी झालेल्या पहिल्या सेमीफायनलसाठी आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली होती.तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये भारत व दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत.मात्र आजच्या दिवसी पाऊसा मुळे फायनलचा सामना होऊ न शकला तर दुस-या दिवशी म्हणजे दिनांक ३० जून रविवारी हा सामना खेळविण्यात येईल.जर या दिवशी देखील पाऊस झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल.