पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करा.तसेच त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करुन त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावे.अशी मागणी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील एकूण ५ गावच्या ग्रामस्थांनी ही मागणी करुन तसा ठराव ग्रामपंचायत मध्ये केला आहे.व त्यांचे राजकीय पुनर्वसन न केल्यास अन्यथा यापुढे भविष्यात भाजपला कधीच मतदान न करण्याचा ठराव देखील एकमताने या पाच गावांनी केला आहे.दरम्यान बीड लोकसभा निवडणूक मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.आता प्रर्यत एकूण ४ कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली आहे.