पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळा प्रकरणी आरोप आहेत.आज सीबीआयच्या याचीकेवर निर्णय देताना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे.त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या तिहार तुरुंगात मुक्काम वाढला आहे.दरम्यान आज सीबीआयच्या वतीने न्यायालयात केजरीवाल यांच्या न्यायालयीन कस्टडीची मागणी केली होती.